जळगाव: सोने बाजारात जुलैच्या शेवटी सोने प्रतिदहा ग्रॅम (विनाजीएसटी) एक लाख ३०० रुपयांवर पोहोचले होते, तर चांदीही प्रतिकिलो (विनाजीएसटी) एक लाख १६ हजारांवर पोहोचली होती. दहा दिवसांत सोन्याच्या भावात ८०० रुपयांची घसरण, तर चांदीच्या भावात चार हजारांची घट झाली आहे.