Jalgaon Monsoon Update : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; पिके, घरं, जनावरांचे मोठे नुकसान
Overview of Heavy Rain in Jalgaon : तीन दिवसांपासून होत असलेला मुसळधार पाऊस व विजेच्या तडाख्यामुळे जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पिके, घरे, जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जळगाव: जिल्ह्यात सोमवारी (ता. १८) सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसाने हजेरी लावली. तीन दिवसांपासून होत असलेला मुसळधार पाऊस व विजेच्या तडाख्यामुळे जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पिके, घरे, जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.