जळगाव- नेरी (ता. जामनेर) येथील तरुणाची शिरपूर तालुक्यातील १८ वर्षीय तरुणीबरोबर इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. त्याने तिला जळगाव बसस्थानकावर भेटण्यास बोलाविले. तेथून तरुणीला मित्राच्या घरी घेऊन गेला. त्याच परिसरात भाड्याने घेतलेल्या खोलीत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.