Jalgaon Municipal Corporation
sakal
जळगाव: पालिका निवडणुकीपाठोपाठ महापालिकेची निवडणूकही झाली. नगराध्यक्ष, नगरसेवकांची पूर्तता झाली. मात्र, जिल्हापरिषद व पंचायत समित्यांची निवडणूक अद्याप झालेली नसल्याने विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक होऊ शकत नाही. परिणामी, गेल्या तीन वर्षांपासून रिक्त असलेली ही ‘स्थानिक स्वराज्य’ची आमदारकी आणखी काही महिने रिक्तच राहणार आहे.