भाजपा जिल्हाध्यक्ष निवडीच्या सभेत दानवे- महाजनांसमोर राडा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 January 2020

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष निवडीच्या सभेत आज केंद्रीयमंत्री माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व माजीमंत्री गिरीश महाजनांसमोर जोरदार राडा झाला. भुसावळ शहर अध्यक्ष निवडीवरुन एकनाथराव खडसेंचे समर्थक तथा जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे यांच्यावर शाई फेकून त्यांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर दानवेंनी सभेतून काढता पाय घेतला. महाजनांनी कार्यकर्त्यांना शांत केल्यानंतर दानवे पुन्हा आले व सभा सुरु झाली. 

भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडीसाठी आज दुपारी 2 वाजता संत बाबा हरदासराम मंगल कार्यालयात सभेस सुरवात झाली. मात्र, सभा सुरु होताच भुसावळ शहरातील कार्यकर्ते थेट व्यासपीठावर पोचले आणि त्यातील एकाने सुनील नेवे यांच्या अंगावर शाई फेकली. नंतर नेत्यांसमोरच त्यांना मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सभेत एकच गोंधळ उडाला. गोंधळ वाढत असल्याने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सभेतून निघून गेले. तर आमदार गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना शांत केले. त्यानंतर पुन्हा सभा सुरू झाले दानवे पुन्हा व्यासपीठावर आले. 

असा झाला वाद 
भाजप भुसावळ शहराध्यक्ष निवड बेकायदेशीरपणे झाल्याने पदाधिकारी नाराज झाले आहेत. भुसावळ शहराध्यक्ष पदासाठी 11 जण इच्छुक होते. परंतु, निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. सुनील नेवे पक्षात नेहमीच मनमानी करतात, त्यामुळे त्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी ही भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news BJP district president rada