कारागृहात "दाऊद'वर प्राणघातक हल्ला 

कारागृहात "दाऊद'वर प्राणघातक हल्ला 

जळगाव : जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार कैद्यांनी अमळनेरचा दाऊद म्हणून ओळख असलेला शुभम मनोज देशमुख ऊर्फ शिवम (वय20) संशयितावर पत्र्याचा चाकू तयार करून हल्ला बुधवारी (ता.15) केला. जखमी "दाऊद' उर्फ शिवम वर जिल्हा रुग्णालयात उपचार 
सुरू आहेत. 

अमळनेरचा दाऊद म्हणून ओळख असलेला शुभम हा अमळनेर येथील दाबेलीवाल्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात 1 जानेवारी 2019 पासून न्यायालयीन कोठडीत आहे. आज सकाळी कैद्यांना बॅरेकमधून बाहेर सोडण्यात आले. दाऊद (शिवम देशमुख) बॅरेक क्रमांक एकच्या बाहेर ओट्यावर उन्हात बसला असतांना त्याच्यावर प्राध्यापकाच्या खुनाचा गुन्हा दाखल असलेला राकेश वसंत चव्हाण, राज वसंत चव्हाण, राहुल पंढरीनाथ पाटील ऊर्फ रामजाने आणि यांच्यासह एक अनोळखी यांनी हल्ला चढवीला. घटनेची माहिती तत्काळ पोलिस मुख्यालय व जिल्हापेठ पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस 
कर्मचारी नाना तायडे, अविनाश देवरे, प्रशांत जाधव यांनी कारागृहात धाव घेत जखमीला जिल्हा रुग्णालयात 
दाखल केले. निरीक्षक अकबर पटेल यांनी स्वत: चौकशी करून जखमीचा जबाब नोंदवून घेत गुन्हा दाखल 
करण्याच्या सूचना दिल्या. 

मागून पकडून केला हल्ला 
दोघांनी दाऊद ऊर्फ शिवमचे हात मागून पकडून ठेवले व समोरून राकेशने त्याच्या हातातील हत्याराने तोंडावर, मानेवर वार केला, ओठांवर जखम झाली असून, त्याने मानेवरील वार चुकवल्याने त्याच्या गालावर मोठी जखम झाली. मागून इतर दोघांनी पाठीत पत्रा खुपसून जखमी केले. कैद्यांची झटापट सुरू असताना आरडाओरड झाल्याने कारागृहाच्या सुरक्षारक्षकांनी धाव घेत दाऊदला चौघांच्या तावडीतून सोडवीले. 

थोडक्‍यात बचावला जीव 
जखमी शिवमच्या गालावर डाव्या बाजूने तब्बल आठ टाक्‍यांची खोल जखम झाली असून ओठावर, कंबरेवर 4 वार आहेत. मानेवरील वार चुकवल्याने शिवम जिवंत असून, दोन-तीन इंच खाली मानेवर वार झाला असता तर, कदाचित त्याचा जीव वाचवता आला नसता, असेही उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी सांगितले. 

असा बनवला चाकू 
कारागृहातील स्वयंपाक घरात तेलाचे डबे आणले जातात. त्यापैकी रिकामा डबा घेऊन त्याचे झाकण मिळवून राकेश चव्हाण याने तिरकस कापून त्याचा चाकू तयार केला आणि संधी मिळताच त्याचा आज शस्त्रासारखा वापर करून दाऊद उर्फ शिवमला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com