गेले अतिक्रमण काढायला...आणि मग काय... 

atikraman vad
atikraman vad
Updated on

जळगाव: शहरातील पांझरापोळ संस्थान कॉम्प्लेक्‍स येथील शान ऑटो दुकानासमोरील अतिक्रमण काढत असताना त्यास विरोध करून अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यास मारहाण करून इतरांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी गणपतीनगरातील नऊ ते दहा जणांविरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्यासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारादरम्यान एकाने उपायुक्तांना लाच देण्याचाही प्रयत्न केला. 

महापालिकेचे उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक हफीज उल्लाखान मोजदारखान यांच्यासह कर्मचारी साजीदअली आबिदअली सय्यद, किशोर सोनवणे, अनिल सोनवणे, ज्ञानेश्‍वर कोळी, सुनील कोल्हे, संजीव परदेशी, संजीव ठाकरे, हिरामण सपकाळे असा कर्मचाऱ्यांचा ताफा आज टॉवर चौकात अतिक्रमण काढण्याचे काम करत होते. यादरम्यान कर्मचारी पांझरापोळ संस्थान कॉम्प्लेक्‍स येथे पोहचले. याठिकाणी शान ऑटो येथील दुकानासमोर रोडवर अतिक्रमण काढण्याबाबत दुकानातील निखिल पोपली यांना विनंती केली. मात्र त्यांनी अरेरावी करण्यास सुरवात करत वाद घातला. याचवेळी शेजारील दुकानदार अशोक विष्णुमल पोपली, राजेश अशोक पोपली, जगदीश अशोक पोपली, दीपक नंदलाल पोपली, करतार पारपयानी हे जमा झाले. त्यांनी अतिक्रमण निर्मूलन पथकातील संजीव परदेशी, साजिदअली सय्यद यांना मारहाण करत कपडे फाडले. इतरांनी दोघांची सुटका केली. 


उपायुक्तांना लाच देण्याचा प्रयत्न 
वाद सुरू असताना दीपक नंदलाल पोपली याने उपायुक्तांसह अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधीक्षकांना लाच देण्याचा प्रयत्न केला. अतिक्रमण काढण्यास आल्यास तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी सर्व जमलेल्या दुकानदारांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दिली. याप्रकरणी कर्मचारी संजीव 
परदेशी यांच्या फिर्यादीवरून निखिल भजनलाल पोपली, अशोक विष्णुमल पोपली, राजेश अशोक पोपली, जगदीश अशोक पोपली, करतार पारपयानी, दीपक नंदलाल पोपली यांच्यासह तीन ते चार जण असे (सर्व रा. गणपतीनगर) यांच्याविरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे तपास करीत आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com