मुलीचे अपहरण प्रकरण :गुन्हेशाखा धडकली संशयिताच्या घरी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

मुलुंड(मुंबई) ते अकोला पायी निघालेल्या मजूर कुटुंबातील तेरा वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयिताचा गुन्हेशाखा कसून शोध घेत आहे. गणेश सखाराम बांगर (वय 32) याच्या वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील घरी पोलिसांचे पथक धडकले. मात्र, तो तेथूनही पसार झालेला असून त्याने काही दिवसांपूर्वीच गावातून नवी स्प्लेंडर दुचाकी चोरून नेली असून त्यावर तो, गुन्हे करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली आहे.

जळगाव,: मुलुंड(मुंबई) ते अकोला पायी निघालेल्या मजूर कुटुंबातील तेरा वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयिताचा गुन्हेशाखा कसून शोध घेत आहे. गणेश सखाराम बांगर (वय 32) याच्या वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील घरी पोलिसांचे पथक धडकले. मात्र, तो तेथूनही पसार झालेला असून त्याने काही दिवसांपूर्वीच गावातून नवी स्प्लेंडर दुचाकी चोरून नेली असून त्यावर तो, गुन्हे करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली आहे. पोलिसांनी त्याचे छायाचित्र जारी केले असून लवकरच त्याला अटक करणार असल्याचे निरीक्षक बापू रोहोम यांनी सांगितले. 

मजुरांचे जत्थे आपापल्या गावी परतत आहे. मुंबईहून अकोला येथे परतणाऱ्या एका कुटुंबीयांतील मुलीचे गणेश बांगर याने दुचाकीवरून अपहरण करून नेले होते. या प्रकरणी नसिराबाद पोलिस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्ह्यात गुन्हेशाखेने तपासाला गती दिली असून गुन्हेशाखेची पथके आज वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथे धडकली. संशयित गणेश बांगर राहत असलेल्या वॉर्ड क्र.(4) मधील त्याच्या घरी मिळून आला नाही. 

गुन्हेगारी वृत्तीचा तरुण 
संशयित गणेश बांगर हा, भामटेगीरीचे धंदे करीत असून त्याने लोणी गावातील मुख्यरस्त्यावर बंद पडलेला ढाबा चालकाला बेणे देऊन ढाबा चालवण्यासाठी घेतला होता. ढाबा चालकाने साफसफाईसाठी आणलेल्या कामगारांपैकी एकाची दुचाकी क्र. (एमएच.19वाय.1847) ही चोरून पोबारा केला. मुंबई-गुजरात राज्यातून पायी येणाऱ्या मजुरांच्या अडचणींचा गैरफायदा घेत लुबाडणूकीचे धंदे तो करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. कसारा घाट परिसरात अशाच पायी चालणाऱ्या मजुरांचा मोबाईलही त्याने गोडबोलून लंपास केल्याचे प्रकरणही समोर आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news ; kidnaping case