शिरपुर, भुसावळात भारत बंदला हिसंक वळण 

st bus
st bus

जळगाव ः सीएए आणि एनआरसी विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंद ला आज धुळे जिल्ह्यातील शिरपुर तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळला हिंसक वळण लागले. निदर्शन करणाऱ्या जमावाने 
दगडफेक केल्याने काही वेळासाठी तणावाचे वातावरण या शहरांमध्ये निर्माण झाले होते. 

बहुजन क्रांती मोर्चाने भारत बंद अंतर्गत आज शिरपूर बंदची हाक दिली होती. शहरातील मांडळ चौफुलीवर सकाळी जमाव फिरून बंदचे आवाहन करीत होता. त्याचवेळी शिरपूर आगाराची शिरपूर-पानसेमल बस तेथून जात होती. जमावाला पाहून चालक अर्जुन बोरसे यांनी बस थांबवून बाजूला घेतली. मात्र जमावातील काहींनी बसची केबिन व प्रवासी आसनांच्या बाजूला दगडफेक केली. या घटनेत बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ हेमंत काशीनाथ चितोडकर (48, रा.धुळे) व सागर अर्जुन पावरा (रा.वकवाड ता.शिरपूर) जखमी झाले. वाहक डी.ए.कोळी यांनी उभयतांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर शिरपूर आगारातील बससेवा तासभर स्थगित करण्यात आली. निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी बाहेरगावाहून येणाऱ्या बसेसच्या मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात केल्यावर बस वाहतूक पुन्हा सुरू झाली. बसची तोडफोड केल्याच्या संशयावरून पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले. दरम्यान दुपारनंतर शहरातील दुकाने उघडून नियमित व्यवहार सुरू करण्यात आले. 

भुसावळात हॉटेलवर दगडफेक 
नागरिकत्व विधेयकाविरुध्द भारतबंदची हाक देण्यात आली होती. मात्र भुसावळ शहरातील व्यापाऱ्यांनी यास विरोध करुन, आज आपली दुकाने सुरु ठेवली. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील हॉटेल आर्यनिवासवर काही उपद्रवींनी दगडफेक केली. रजा टॉवर परिसरातून जमाव बाजारात दुकाने बंद करण्यासाठी येत असताना, समोरच असलेल्या हॉटेल आर्यनिवासवर दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे मात्र बाजारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता, घटनास्थळी जाऊन जमावास पांगवित, शांततेचे आवाहन केले. त्यामुळे पुढील वाद निवळला. उपविभागीय पोलिस अधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी जमावाची शांत केले. 

जळगाव शहरात समिश्र प्रतिसाद 
बहूजन क्रांती मोर्चा व विविध संघटनांतर्फे आज नागरीत्व कायद्याविरोधात शहारातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात बंदचे आवाहन करण्यासाठी मोठ्या संख्येने जमाव एकत्रीत आला होता. यावेळी पोलिस व आंदोलन कर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी भारत बंद समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मध्यस्तीने हा वाद मिटवण्यात आला. तर इच्छादेवी चौकात एका सलुन दुकानावर दगडफेक करण्यात आली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com