अंत्ययात्रेला आला अन...सात वर्षानंतर सापडला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

जळगाव ः एका गुन्हात न्यायालयाने दोषी ठरविलेल्या आरोपी राज्याबाहेर तसेच अनेक जिल्ह्यात नावे व पत्ते बदलवून स्थानीक पोलिसांसह जिल्हा पोलीस यंत्रणेला गुंगारा देवून सापडत नव्हता. जळगाव स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून जळगाव शहरात नातेवाईंकाच्या अंत्ययात्रेत आलेल्या या आरोपीच्या पोलिसांनी सात वर्षानंतर मुसक्‍या आवळल्या. 

जळगाव ः एका गुन्हात न्यायालयाने दोषी ठरविलेल्या आरोपी राज्याबाहेर तसेच अनेक जिल्ह्यात नावे व पत्ते बदलवून स्थानीक पोलिसांसह जिल्हा पोलीस यंत्रणेला गुंगारा देवून सापडत नव्हता. जळगाव स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून जळगाव शहरात नातेवाईंकाच्या अंत्ययात्रेत आलेल्या या आरोपीच्या पोलिसांनी सात वर्षानंतर मुसक्‍या आवळल्या. 

चाळिसगाव पोलिस स्टेशनमध्ये आरोपी अन्वरशहा बाबुशहा फकीर (वय 62 रा. लोजे. ता. चाळिसगाव) यास जिल्हा न्यायालयाने गुन्ह्यात दोषी धरुन 1 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेवर अन्वरशहा याने औरंगाबाद खंडपीठात पूर्णयाचिका दाखल केली होती. यावर खंडपीठाने अन्वरशहा बाबुशहा फकीर याची शिक्षा कायम ठेवली होती. शिक्षा कायम ठेवल्याच्या आदेशानंतर फकीर शहा फरार झाला होता. जिल्हा न्यायालयाने त्याचे वॉरंट काढले होते. तर खंडपीठाने त्याच्या अटकेसाठी विशेष पोलीस महानिरिक्षकांना पत्रव्यवहार करुन आदेश दिले होते. त्यानुसार विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरींग दोरजे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना सुचना दिल्या होत्या. 

पोलीस अधीक्षक डॉ. उगलेंनी अन्वरशहा यांच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम, सहायक पोलीस निरीक्षक राजेश शिंदे, पोलिस हेड कॉन्सटेबल जितेंद्र पाटील, अनिल देशमुख , विनोद पाटील, प्रविण हिवराळे या विशेष पथकाला नियुक्त केले होते. या पथकाने मध्यप्रदेश राज्यातील नरसिंगपूर येथे जावून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी फायनान्सचे कर्मचारी असल्याचे सांगितल्यावर अन्वरशहाबद्दल माहिती मिळाली होती. मात्र याठिकाणी तो मिळाला नाही. यानंतर सिल्लोड तालुक्‍यतीाल आमढाणे येथे पथक रवाना झाले. याठिकाणी माहिती मिळावी म्हणून पथकाला घरकुल योजनेचे कर्मचारी असल्याची शक्कल लढवावी लागली. मात्र यानंतरही पथकाला रिकामे हाते परतावे लागले. पथकाने महिनाभरात मध्यप्रदेशसह विविध जिल्हे पिंजून काढले. 

अन..मिळाला अन्वरशहा 
अन्वरशहा हा वेळावेळी वास्तव्याचे ठिकाण बदलवून नाव, पत्ते देखील बदलवत होता. तसेच त्याचा शोध लागू नये म्हणून आधारकार्ड देखील काढले नव्हते. तब्बल महिनाभरानंतर गुरूवारी (ता.9) अन्वरशहा जळगावातील त्याच्या नातेवाईकाच्या अंत्ययात्रेला आला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पथकाने घटनास्थळ गाठले अन्‌ सापळा रचून अन्वरशहाला सात वर्षानंतर अटक केली. पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या दालनात अन्वरशहाला अटक करणाऱ्या पथकाला बोलावून त्यांचे विशेष कौतुक केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news pollic arest aropi