आधी यथेच्छ दारूची पार्टी...मग चोरी 

दीपक कच्छवा
Friday, 10 January 2020

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : पिलखोड (ता. चाळीसगाव) येथे चोरट्यांनी बंद घराच्या छतावरील खिडकीचे लोखंडी गज कापून घरात प्रवेश केला. चोरी करण्यापूर्वी त्यांनी घरातच यथेच्छ मद्य प्राशन करून घरातच पार्टी केली. त्यानंतर कपाटातील रोख रक्कम 17 हजार रूपये व सोन्या चांदीचे दागिणे असा 74 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. 

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : पिलखोड (ता. चाळीसगाव) येथे चोरट्यांनी बंद घराच्या छतावरील खिडकीचे लोखंडी गज कापून घरात प्रवेश केला. चोरी करण्यापूर्वी त्यांनी घरातच यथेच्छ मद्य प्राशन करून घरातच पार्टी केली. त्यानंतर कपाटातील रोख रक्कम 17 हजार रूपये व सोन्या चांदीचे दागिणे असा 74 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. 

पिलखोड येथील नरेंद्र केदारनाथ दंडगव्हाळ हे परिवारासह राहतात (ता. 6 रोजी) दंडगव्हाळ हे परिवारासह त्यांचे काका सुभाष दंडगव्हाळ यांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथे गेलेले होते. (ता.9) रोजी रात्री 8 वाजता हे कुटुंब पिलखोड येथे परतले. घराचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केला असता घरात फरशीवर दारूच्या बाट्‌ल्या व ग्लास पडलेले दिसले. दंडगव्हाळ यांनी बेडरूममध्ये जावून पाहीले असता बेडरूममधील लोखंडी कपाटाचे दार तोडून लॉकर वाकवून तुटलेल्या अवस्थेत दिसले. भाऊ योगेंद्र याच्या बेडरूमधीलही लोखंडी कपाटाचे दार तोडून 
कपाटातील वस्तु व कपडे अस्तव्यस्त पडलेले दिसले. नरेंद्र दंडगव्हाळ यांच्या बेडरूममधील कपाटातून रोख 10 हजार रूपये व 2 ग्रॅम वजनाच्या प्रत्येकी अर्धा ग्रॅम वजन असलेल्या 4 सोन्याच्या अंगठ्या, भाऊ योगेंद्र यांच्या कपाटातून रोख 7 हजार रूपये व 10 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 7 ग्रॅम वजनाच्या कानातील दोन रिंग, 3 ग्रॅम वजनाचा व 4 ग्रॅम वजनाचा जोड असा सुमारे 74 हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास झाल्याचे आढळून आले. 

छतावरील खिडकीतून केला प्रवेश 
चोरट्यांनी घराच्या छताच्या सान्याचे लोखंडी गज कापून त्याद्वारे घरात प्रवेश करून दोन्ही कपाटातून किंमती ऐवज चोरून नेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी नरेंद्र केदारनाथ दंडगव्हाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news robary news