पैशांच्या आमीषा पोटी तरुणी अडकतात दलालांच्या सापळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

मध्यमवर्गीय तरुणींना हायफाय जीवनशैलीचे स्वप्न दाखवत त्यांना वाममार्गाला लावणाऱ्या काही "अंटी' सक्रिय असून, दोन महिन्यांपूर्वी पिंप्राळ्यातील छाप्यात राजकीय पार्श्‍वभूमी असणारी महिला कुंटणखाना चालवताना आढळून आली. खेडी येथील प्रकरणातील पराग प्रकाश लोहार हा दोन कुंटणखान्यांचा मालक असून, महिला व दलाल मुरलीधर चव्हाण याच्या माध्यमातून हायप्रोफाइल कुंटणखाना चालवत असल्याचे निष्पन्न झाले असून, अटकेतील संशयितांना आज न्यायालयात हजर केले.

जळगाव; सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी गेल्या सहा महिन्यांत चार हायप्रोफाइल कुंटणखान्यांवर छापे घालून संशयित महिलांना अटक केली. मध्यमवर्गीय तरुणींना हायफाय जीवनशैलीचे स्वप्न दाखवत त्यांना वाममार्गाला लावणाऱ्या काही "अंटी' सक्रिय असून, दोन महिन्यांपूर्वी पिंप्राळ्यातील छाप्यात राजकीय पार्श्‍वभूमी असणारी महिला कुंटणखाना चालवताना आढळून आली. खेडी येथील प्रकरणातील पराग प्रकाश लोहार हा दोन कुंटणखान्यांचा मालक असून, महिला व दलाल मुरलीधर चव्हाण याच्या माध्यमातून हायप्रोफाइल कुंटणखाना चालवत असल्याचे निष्पन्न झाले असून, अटकेतील संशयितांना आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्वांना 26 मेपर्यंत पोलिस कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले. पीडित तरुणींना महिला सुधारगृहात रवाना केले असून, तिघांची कोठडीत रवानगी केली. 
शहरानजीकच्या खेडी बुद्रुकमधील ज्ञानचेतना रेसिडेन्सीत गोपाळ प्रल्हाद पाटील यांच्या फ्लॅटमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. रोहन यांना मिळाली होती. त्यानुसार पंधराशे रुपये देत बनावट ग्राहकास पाठविले. दलाल मुरलीधर देविदास चव्हाण (रा. करंजी, ता. बोदवड) याच्या माध्यमातून फ्लॅटमध्ये पोहोचल्यावर दोन कुंटणखाना मालकिणींनी त्याला दोन मुली दाखविल्या. त्यावर कुंटणखानाच असल्याची खात्री पटल्याने पोलिसांना इशारा दिला असता छापा घालून दोन पीडित मुलींसह दोन महिला व पराग लोहार यांना अटक केली असून, दलाल मुरलीधर चव्हाण पसार झाला. या कारवाईत पोलिसांनी महागडे पाच मोबाईल तसेच एक लाख रुपये किमतीची बुलेट (एमएच 19- सीएन 2121) जप्त केली. 

कमी वयाच्या तरुणी सावज 
मध्यमवर्गीय व गरजू तरुणींना हेरून त्यांना कार, महागड्या हॉटेलचे जेवण, महागडे मोबाईल आणि खर्चायला पैशांचे आमिष दाखवत आपल्या जाळ्यात ओढले जाते. गुन्हा दाखल झाल्यावर या मुलींना शासकीय वसतिगृहात दाखल केले जाते. तेथून त्यांची काही दिवसांनंतर सुटका होते अन्‌ त्या पुन्हा याच गर्तेत ओढल्या जातात. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news;Brothel in jalgaon