harassment case
sakal
जळगाव: शहरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने त्रासाला कंटाळून गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. प्रांजल रमेश ठाकूर (वय १६, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मृत मुलीचे नाव आहे.