जळगाव- जिल्ह्यात आठवडे बाजारासह गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल लंपास करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन अल्पवयीन मुलांसह टोळीचा म्होरक्या तरुण नोरसिंह गुजरिया (वय २३) याला ताब्यात घेतले असून, स्वामीनारायण मंदिराजवळील निर्जनस्थळी एका झाडाच्या पायथ्याशी जमिनीत गाडून ठेवलेले सुमारे साडेचार लाखांचे ३३ मोबाईल या टोळीने काढून दिले आहे.