Municipal Election
sakal
जळगाव: शहर महापालिकेच्या निवडणुकीत माघारीच्या प्रक्रियेनंतर महायुतीला मोठा राजकीय लाभ मिळाला आहे. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी सहा जागा बिनविरोध मिळवून एकूण १२ जागांवर आपला विजय निश्चित केला. या घडामोडींमुळे महापालिकेतील निवडणुकीचे समीकरण बदलले असून, उर्वरित ६३ जागांसाठी आता लढत होणार आहे.