Jalgaon Municipal Election
sakal
जळगाव: येथील महापालिका निवडणुकीत राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. सर्वच राजकीय पक्ष जाहीर सभा, रॅलीद्वारे आठ दिवसांपासून नागरिकांशी संपर्क साधत आहेत. प्रचाराचे अवघे तीन दिवस उरले असून, रविवारी (ता. ११) सुटीचा दिवस असल्याने सर्वच पक्षांसह प्रचार रॅली, सभांचे नियोजन केले आहे. उमेदवारांचा घरोघरी मतदारांच्या भेटीवर भर असून, रविवारचा दिवस म्हणजे उमेदवारांसाठी प्रचाराचा ‘सुपर संडे’ ठरणार असल्याचे दिसून येत आहे.