Jalgaon Municipal Election
sakal
जळगाव: महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४६ जागांवर विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या विजयी उमेदवारांमधून गटनेतेपदी प्रकाश बालाणी यांची निवड करण्यात आली. उपगटनेतेपदी नितीन बरडे तर प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड झाली. या निवडीमुळे महापालिकेतील भाजप गटाची संघटनात्मक रचना निश्चित झाली असून, पुढील महापौर निवडीसाठी भाजप सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. या निवडीनंतर नाशिक येथे भाजपच्या गटाची नोंदणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली.