Gulabrao Patil
sakal
जळगाव: शहरात बुधवारी (ता. २४) भारतीय जनता पक्ष- शिवसेनेच्या नेत्यांमध्ये महापालिका निवडणुकीसाठी चर्चा होऊन युती करण्यावर एकमत झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यासंबंधी घोषणाही केली. मात्र, रविवारी (ता. २८) जागावाटपावरून दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये वाद झाला आणि चर्चा अर्धवट सोडून मंत्री पाटील तावातावातच बैठकीतून बाहेर पडल्याचे वृत्त आहे. रविवारी दिवसभरात घडलेल्या या घडामोडींमुळे युतीत तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.