Municipal Election
sakal
जळगाव: महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटात रात्री उशिरापर्यंत मुलाखतींची प्रक्रिया सुरू होती. दोन्ही पक्षांच्या मुलाखत प्रक्रियेवेळी ठाकरे गटासह राष्ट्रवादीचेही चेहरे मुलाखतीसाठी उपस्थित राहिल्याचे दिसून आले. तर भाजपने घेतलेल्या मुलाखत प्रक्रियेत २६ प्रश्नांची प्रश्नावली देण्यात आली होती. या प्रश्नावलीने इच्छुक उमेदवारांना चांगलाच घाम फोडल्याचे चित्र दिसून आले.