Jalgaon Municipal Election
sakal
जळगावत: महापालिकेच्या निवडणुकीत भाजप- शिवसेनेचे प्रत्येकी सहा असे महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले असले, तरी उर्वरित जागांपैकी काही जागांवरील लढती रंगतदार ठरणार आहेत. निवडणुकीच्या रिंगणात पाच माजी महापौरांसह दोन उपमहापौरांचीही कसोटी लागणार आहे. या माजी पदाधिकाऱ्यांसमोर प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षातील उमेदवारांसोबतच अपक्षांचे आव्हान असणार आहे.