Jalgaon Election Violence
sakal
जळगाव: आमच्या भागात प्रचाराला कसे आले, असा दम देत उमेदवार महिलेच्या सासऱ्याला प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या दिराने मारहाण केली. ही घटना बुधवारी (ता. ७) सकाळी अकराला चौघुले प्लॉट परिसरात घडली. मारहाण झाल्याची तक्रार घेऊन उमेदवाराची प्रचार रॅली थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात पोहोचली. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.