police protection
sakal
जळगाव: महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आपापल्या वॉर्डात घरोघरी उमेदवारांच्या भेटीगाठींसह प्रतिस्पर्धी उमेदवारांबरोबर समोरासमोर आल्याने खटके उडू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी कांचननगर भागात अशीच हाणामारीची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी संवेदनशील परिसरासह जुने वाद असणाऱ्या ३१ उमेदवारांना पोलिस संरक्षण प्रदान केले आहे.