Jalgaon Municipal Election
sakal
जळगाव: येथील महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, वातावरण अधिकाधिक तापलेले दिसून येत आहे. सुरुवातीला स्वतंत्रपणे मैदानात उतरलेले अपक्ष उमेदवार आता एकत्र येत पॅनलच्या स्वरूपात प्रचार करीत आहेत. या नव्या समीकरणामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर अनपेक्षित आव्हान उभे राहिले आहे.