Municipal Election
sakal
जळगाव: आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांसह इतर मित्रपक्ष एकत्र निवडणूक लढविणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ३७, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ३८ असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.