Jalgaon Municipal Election
sakal
जळगाव: येथील महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नगरसेवकांच्या ७५पैकी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीने तब्बल ६९ जागांवर विजय मिळवीत एकहाती सत्ता प्राप्त केली आहे. येणाऱ्या आठवडाभरात महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत निघून निवडीचा मार्ग मोकळा होईल. तोपर्यंत महापालिकेची सतरा मजली प्रशासकीय इमारत सोळाव्या महापौरपदाच्या प्रतीक्षेत आहे.