Jalgaon Municipal Election
sakal
जळगाव: महापालिका निवडणुकीत भाजप- शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविल्यानंतर आता महापौरपदासह अन्य सत्तेची पदे निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपने या वेळी महापौरपदासाठी ‘सुरेशदादा जैन पॅटर्न’ राबविण्याचे ठरविले असून, त्या अंतर्गत पाच वर्षांत पाच जणांना या पदासाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच स्थायी समिती सभापतिपदही दर वर्षी वेगवेगळ्या सदस्यांना मिळेल, असे ठरल्याचे सांगितले जात आहे.