जळगाव- राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद टोल नाक्याजवळ वाळूच्या सुसाट डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने युवक जागीच ठार झाला. शिरसाळा येथील प्रसिद्ध मारुती मंदिराच्या दर्शनासाठी निघालेला दुचाकीस्वार ठार झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (ता. १९) सकाळी सहाच्या सुमारास घडली. हर्शल राजू पाटील (वय १९, रा. वराड, ता. धरणगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. तर मागे बसलेला त्याचा मित्र कुणाल गोकुळ पाटील (रा. वराड, ता. धरणगाव) गंभीर जखमी झाला.