Motivational : जळगाव नेऊरची पैठणी चक्क सातासमुद्रापार!..

jalgaon neur paithni.jpg
jalgaon neur paithni.jpg

नाशिक : जिद्द असेल तर यश नक्कीच मिळते यानुसार जळगाव नेऊर ता.येवला येथील मराठमोळ्या तरुणांनी दोन वर्षापूर्वी प्रतिकूल परिस्थितीत स्वकर्तुत्वाच्या जोरावर पैठणी व्यवसायास प्रारंभ करून अल्पावधीतच पैठणी व्यवसायाची भरभराट होत सातासमुद्रापार झेप घेवून सिद्ध करून दाखवले.विशेष म्हणजे पैठणीच्या माध्यमातून येथील अनेक तरूणांबरोबर २५० ते ३०० कुटुंबांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून त्यांना जगण्याची दिशा दिली.

महिला वर्गाला पैठणी खरेदीची भुरळ

नाशिक औरंगाबाद हायवेवरील जळगाव नेऊर येथे भव्य दिव्य पैठणी दालनांची निर्मिती झाल्याने महिला वर्गाला पैठणी खरेदीची भुरळ झाल्याशिवाय राहत नाही.वर्षभर लग्नकार्य, विविध कार्यक्रमासाठी पैठणी दालनांमध्ये खरेदीची लगबग असते. विशेषतः सध्या दीपावली निमित्त खास पैठणी महोत्सवाची धूम सुरू असुन दुरून आलेल्या ग्राहक वर्गाकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभत आहे.त्यात प्रामुख्याने प्रसिद्ध सिने कलाकार, आंतरराष्ट्रीय खेळाडूंंबरोबर परदेशी पर्यटकांनाही पैठणी खरेदीचा मोह आवरत नाही.

इच्छा असेल तर मार्ग दिसेल 

२००६ पासून येथील तरुणांनी पैठणी क्षेत्रात अगोदर पैठणी निर्मिती व मार्केटिंगचे लकब आत्मसात केले. इच्छा असेल तर मार्ग दिसेल या उक्तीप्रमाणे या व्यवसायाला अल्पावधीतच गती प्राप्त होत गेली. अनेक संकटांना सामोरे जाऊन या युवकांनी अगोदर स्व मालकीचे हातमाग उभे करत पैठणी विणकामामुळे गावात रोजगार उपलब्ध करून दिला.आजच्या स्थितीत प्रतिकूल परिस्थितीत शून्यातून नाशिक, पुणे व मुंबई सारख्या एसी दालनासहीत पैठणीची भव्य दालने, शोरूम येथे उभे केले. परदेशातील अनेक ग्राहक येथे खासकरून पैठणी घेण्यासाठी थांबतात.

पैठणी व्यवसायाची मुहूर्तमेढ

जळगाव नेऊर येथे प्रथमतः संस्कृती पैठणी दालनाने पैठणी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली त्यानंतर कलादालन पैठणी, सौभाग्य पैठणी,कलासंस्कृती पैठणी,रेशीमबंध पैठणी,थोरात पैठणीचे दालने कार्यान्वित झाले. नुकतेच लावण्य पैठणी दालनाचा उदघाटन सोहळा प्रसिद्ध सिने अभिनेत्री श्रृती मराठे यांच्या हस्ते पार पडला. संस्कृती पैठणीचे गोविंद तांबे,कलादालन पैठणीचे मेघशाम ठोंबरे,पोपट शिंदे, सौभाग्य पैठणीचे  संतोष राजगुरू, शिवाजी तांबे, राहुल राजगुरू, कलासंस्कृती पैठणीचे दत्तु वाघ, तुकाराम रेंढे, रेशीमबंध पैठणीचे संदिप तनपुरे, राहुल शेळके, थोरात पैठणीचे प्रमोद थोरात,कैलास गायकवाड, लावण्य पैठणीचे  प्रा.प्रतिभा काळे,मनिषा कोठूरकर,आकाश ठोंबरे आदी तरूण, महिला पैठणी उत्पादक व विक्रेते म्हणून कामकाज बघत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com