होमक्वांरटाईन चौघांवर गुन्हा दाखल ;जिल्ह्यात पहिला गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 मे 2020

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मजूर,श्रमीकांचे बाहेरील राज्यातून आणि जिल्ह्यातून आगमन झाले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर बाहेरून आलेल्यांची वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना 14 दिवस "होमक्वारंटाईनचा' सल्ला देण्यात आला होता. 14 दिवसांचा कालावधी संपलेला नसतानाही बेकायदेशीर बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव,:- मुंबईहून दोन जणांना जळगावात आणले. यानंतर संबंधित चौघांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना "होम क्वारंटाईन' करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांनी घरात न राहता चौघेही आणि मास्क न लावता विनाकारण बाहेर फिरताना आढळून आल्याने साहिल पठाण (वय 26, रा. ह.मु.समतानगर, मूळ रा.पाळधी,ता.धरणगाव), आदिल नवाज खान (वय-24), सुमीत बनसोडे व एक महिला (सर्व रा.शिवमंदिर,समतानगर) या चौघांच्या विरोधात मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मजूर,श्रमीकांचे बाहेरील राज्यातून आणि जिल्ह्यातून आगमन झाले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर बाहेरून आलेल्यांची वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना 14 दिवस "होमक्वारंटाईनचा' सल्ला देण्यात आला होता. 14 दिवसांचा कालावधी संपलेला नसतानाही बेकायदेशीर बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश कालच इंन्सिडंन्ट कमांडर गोरक्ष गाडीलकर, पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी याबाबत कारवाईचे आदेश अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके व पोलिस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना दिल्या आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार राठोड,अतुल पवार, नरेंद्र पाटील हे गस्तीवर असताना गस्तीदरम्यान त्यांना तीन ते चार जण तोंडाला मास्क न लावता विनाकारण फिरत असताना आढळून आले. चौकशी अंती त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून "होमक्वारंटाईन' केलेल्या व्यक्तींवर दाखल झालेला हा जिल्ह्यातला पहिलाच गुन्हा आहे. 

भिवंडीहून जळगावात 
पोलिसांनी केलेल्या चौकशीत साहिल पठाण आणि आदिल खान यांनी 15 मे रोजी सुमीत बनसोडे आणि एक महिला (नाव गाव पूर्ण माहीत नाही) या दोघांना गोधवली ता. भिवंडी जि.ठाणे येथून शहरात आणल्याचे समोर आले. तसेच वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना होम क्वारंटाईनच्या सूचना असतानाही ते विनाकारण मास्क न लावता फिरत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार चारही जणांवर मास्क न लावता काहीएक कारण नसताना बाहेर फिरताना मिळून आले असता कोविड 19 संसर्गजन्य आजार प्रसरविण्याची हयगई व घातककृती केली म्हणून भादवि कलम 188, 269, 270 अन्वये रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news; afence rajestar on four persone