दोन सेवानिवृत्त पोलिसांचा मृत्यू ; कोरोनात वेळीच उपचार मिळेना 

jalgaon news ; Death of two retired policemen
jalgaon news ; Death of two retired policemen


जळगाव, :- शहरातील कोरोना हॉस्पिटल मध्ये आज कोरोना संक्रमणात मृत्यू झालेल्या चौघांपैकी तीन भुसावळ येथील रहिवासी आहेत. तर, दोन सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी असल्याची माहिती प्राप्त झाली. वेळीच योग्य उपचार न झाल्याने आणि वयाच्या मर्यादेमुळे या चारही लोकांना जीव गमवावा लागल्याचे वैद्यकीय सुंत्रान्वये माहिती मिळाली. 

जळगाव कोव्हीड रुग्णालयात 8 मे पासून दाखल ग्रीनपार्क भुसावळ येथील सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा आज सकाळी मृत्यू ओढवला. मृत्युपूर्व संध्याकाळीच त्यांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला होता. प्रकृती खालावल्याने त्यांना मध्यरात्री जिल्हारुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. मात्र, येथे बेड खाली नसल्याचे कारण देत तासभर रुग्णाला थांबावे लागले. डॉक्‍टरांनी रुग्णाची परिस्थिती पाहिल्यावर त्याला तत्काळ दाखल करून घेतले मात्र, दिवस उजाडण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.दुसऱ्या एका प्रकरणातील भुसावळ येथील 56 वर्षीय महिलेचा सकाळी मृत्यू झाला. दाखल झाल्यानंतर या महिलेला श्‍वात्सोश्‍वास घेण्यास त्रास होत असताना या वॉर्डातून त्या वॉर्डात फिरवले गेले होते. औषधांना प्रतिसाद न दिल्याने अखेर त्यांचा मृत्यू झाला. आणखी एक भुसावळच्या वृद्धाचा आज मृत्यू झाला असून तिघांवर जळगाव शहरातच दफन विधी करण्यात आला. समतानगर येथील सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याला संक्रमण होऊन आज त्यांनाही प्राणास मुकावे लागले. अशा चार वेगवेगळ्या प्रकरणात कोव्हीड संक्रमणाने मृत्यू झाले आहेत. 

मृत्यूनंतरही प्रतीक्षाच 
कोव्हीड रुग्णालयात रुग्णासोबत थांबण्यास मनाई करण्यात आलेली आहे, सोबत आलेल्या नातेवाइकाला रुग्णा जवळ थांबता येत नाही. मृत्यू झाल्यानंतर मृतदेह सोपवल्यानंतर महापालिकेच्या शववाहिकेतून मृतदेह घेऊन जाणे अपेक्षित असताना, दोन-दोन तास वाहन उपलब्ध होत नाही. याची तक्रारीही मागे करण्यात आलेली होती. त्यानंतर कोव्हीड रुग्णालयातच शववाहिका उपलब्ध करून दिल्या असताना त्याची माहिती रुग्णा सोबतच्याला नसते. मृतदेह ताब्यात देताना अंत्यविधीसाठी तीन पीपीई किट देण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आलेली असताना केवळ एकच किट जवळच्या नातेवाइकासाठी दिले जाते. त्या एकट्याला मृतदेह उचलून अंत्यसंस्कार करणे अशक्‍य असल्याने मृत्यूनंतरही अवहेलनाच नशिबी असल्याचा वाईट अनुभव आता येऊ लागला आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com