परप्रांतिय मजुरांच्या आयशरची दुचाकीला धडक ; दुचाकीस्वार ठार एक गंभीर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मे 2020

कवयत्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या प्रवेशद्वारा समोरच मागून सुसाट वेगात येणाऱ्या आयशर()ने महेंद्र पाटिल यांच्या दुचाकीला मागून धडक दिली, नंतर प्रल्हाद यांच्या दुचाकीला धडक लागली. आयशरच्या धडकेत महेंद्र यांचा जागीच मृत्यु ओढवला तर प्रल्हाद गंभीर जखमी झाले. अपघात घडताच महारामार्गव्रुन ये-जा करणाऱ्या मोटारसायकलस्वार, ग्रामस्थ आणि वाहनधारकांनी मदतीला धाव घेतली.

जळगाव, :- परप्रांतिय मजुरांना घेवुन निघालेल्या आयशर ट्रकने कवयत्री बहिणाबाई विद्यापिठा समोर दोन दुचाकीस्वारांना एकामागून एक धडक दिली. अपघातात एकाचा जागीच मृत्यु ओढवला तर, दसरा गंभर जखमी झालेला होता. अपघात घडताच रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनधारक ग्रामस्थांनी मदतीला धाव घेतली. अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रकचालकाचा पाठलाग करुन त्याला पकडण्यात आले. मृतदेह आणि जखमीला वेगवेगळ्या खासगी वाहनांनी रुग्णालयात हलवण्यात आले. पाळधी औटपोस्ट पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

पाळधी (ता.धरणगाव) येथील रहिवासी महेंद्र रमेश पाटिल (वय-36) आणि प्रल्हाद रमेश पाटिल (वय-30) दोन्ही भावंड गावखेड्यात घरोघरी जावुन चहा पावडर विक्रीचा व्यवसाय करतात. आज सकाळी दोघं भावंड कामानिमीत्त बाहेर पडले, शहरातून माल घेवून तो..गावोगावी विक्रीसाठी दोघे ही आप-आपल्या दुचाकीने घरुन निघाले होते. 
कवयत्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या प्रवेशद्वारा समोरच मागून सुसाट वेगात येणाऱ्या आयशर()ने महेंद्र पाटिल यांच्या दुचाकीला मागून धडक दिली, नंतर प्रल्हाद यांच्या दुचाकीला धडक लागली. आयशरच्या धडकेत महेंद्र यांचा जागीच मृत्यु ओढवला तर प्रल्हाद गंभीर जखमी झाले. अपघात घडताच महारामार्गव्रुन ये-जा करणाऱ्या मोटारसायकलस्वार, ग्रामस्थ आणि वाहनधारकांनी मदतीला धाव घेतली. जखमीला तातडीने खासगी रुग्णालयात रवाना करण्यात आले, तर मृतदेह जिल्हारुग्णालयात पाठवण्यात आला. घटनेचे वृत्त कळताच पाळधी औटपोस्टचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. 

ट्रकचालकाचा पळण्याचा प्रयत्न 
सकाळीच नऊ वाजता दुचाकीस्वाराला चिरडून सुसाट निघुन जाण्याच्या प्रयत्नात आशर चालकाने वाहन दामटले. मात्र, बांभोरी येथील ग्रामस्थ आणि तरुणांनी दुचाकीने पाठलाग करुन ट्रक अडवला. चालकासह ट्रक पाळधी औटपोस्टला नेण्यात आला असुन गुन्हा दाखल करण्याचे काम सरु होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news ; Eicher's bike hit; A serious one killed the biker