उशिखालुन लांबवले मोबाईल ; गच्चीवर झोपलेल्या लुंकड परिवाराचे चार मोबाईल चोरी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मे 2020

मेहरुण रामनगर येथील रहिवासी शैलेश लुंकड यांचे कुटुंबीय गच्चीवर झोपले होते. मध्यरात्री नंतर अज्ञात चोरट्यांनी उशीखाली ठेवलेले एका मागून एक चार मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव,:- शहरातील मेहरुण रामनगर येथील रहिवासी शैलेश लुंकड यांचे कुटुंबीय गच्चीवर झोपले होते. मध्यरात्री नंतर अज्ञात चोरट्यांनी उशीखाली ठेवलेले एका मागून एक चार मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

जळगाव शहरातील मेहरुण रामनगर येथे शैलेश हिरालाल लुंकड(वय-25) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. शुक्रवार (ता.15) रोजी रात्री जेवणानंतर नेहमीप्रमाणे संपूर्ण कुटुंबीय गच्चीवर झोपण्यासाठी गेले. पहाटे चार वाजता नळाला पाणी येणार असल्याने शैलेश झोपेतून उठून आपला मोबाईल शोधला असता त्यांच्या उशी खाली ठेवलेला मोबाईल गायब असल्याचे आढळून आले, तेव्हा त्यांनी आई-वडील आजोबांना विचारणा केली असता त्यांच्याही उश्‍या खालील मोबाईल चोरीला गेल्याचे आढळून आले.शैलेश यांच्या कुटुंबातील 18 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या प्रकरणी शैलेश लुंकड यांनी तक्रार दिल्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news ;Four mobile phones stolen from Lunkad family sleeping on the terrace

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: