esakal | सायकल आवडली अन्‌ लंपास केली  ; अल्पवयीन संशयीतांसह दोन दिवसात तीघे ताब्यात ; 
sakal

बोलून बातमी शोधा

सायकल आवडली अन्‌ लंपास केली 

टिएम नगरात कंपाऊड मध्ये नवी कोरी सायकल बघून दोघा अल्पवयीन तरुणांना या सायकलचा मोह अनावर झाल्याने, त्यांनी पाळत ठेवून सायकल लपांस केली. तीघा मित्रांनी दोन दिवस तिच्यावर रपेटही मारली. अचानक इतकी महागडी सायकल या पोराकडे आली कोठून..या एका प्रश्‍नातून माहिती पोलिसांत पोहचली आणि सायकल चोरणाऱ्यांच्या हाती बेड्या पडल्या. 

 

सायकल आवडली अन्‌ लंपास केली  ; अल्पवयीन संशयीतांसह दोन दिवसात तीघे ताब्यात ; 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव,:- शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील टीएम नगरातून महागडी सायकल व हवा मारण्याचा पंप चोरीची घटना घडली होती. गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन दिवसात एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याचा शोध घेत दोन अल्पवयीन संशयीतांसह तिघांना अटक केली असून चोरीची सायकल आणि पंप चोरट्यांनी काढून दिला आहे. 


सिंधी कॉलनीतील टीएम नगरात जितेंद्र श्रीचंद तलरेजा कुटुंबासह वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणे त्यांनी आपली पंधरा हजार रुपये किमतीची सायकल घराच्या कंम्पाउंडमध्ये उभी केली होती. सकाळी 7 वाजता उठल्यावर सायकलींगसाठी निघतांना कम्पाऊंडमध्ये उभी केलेली सायकल तसेच हवा मारण्याचा पंप त्यांना दिसला नाही .एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून त्यांनी तक्रार केली होती. याप्रकरण शुक्रवार(ता.15) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यात संशीतांचा शोध सुरु होता. निरीक्षक विनायक लोकरे, यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार आनंदसिग पाटिल, हर्षवर्धन सपकाळे, सचिन चौधरी, सचिन पाटिल अशांनी परिसरातील भंगार व्यवसायीक आणि चोरट्यांचा शोध घेतला असता. चोरीला गेलेल्या हिरव्या रंगाची सायकल मेहरुण मधील काही तरुण फिरवत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन त्यांनी अविनाश रामेश्‍वर राठोड (वय-19) याला ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली देत त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांची नावे सांगीतली. पोलिस प्रसाद मिळण्यापुर्वीच संशयीतांनी चोरीची सायकल काढून दिली. 

सायकलच्या मोहातुन पडल्या बेड्या 
टिएम नगरात कंपाऊड मध्ये नवी कोरी सायकल बघून दोघा अल्पवयीन तरुणांना या सायकलचा मोह अनावर झाल्याने, त्यांनी पाळत ठेवून सायकल लपांस केली. तीघा मित्रांनी दोन दिवस तिच्यावर रपेटही मारली. अचानक इतकी महागडी सायकल या पोराकडे आली कोठून..या एका प्रश्‍नातून माहिती पोलिसांत पोहचली आणि सायकल चोरणाऱ्यांच्या हाती बेड्या पडल्या. 


 

loading image
go to top