जळगाव शहरात संततधार सुरू असल्यामुळे रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दररोज खड्ड्यांचा सामना करावा लागतोय. केवळ संततधार नव्हे, तर या समस्येला गेल्या काळात जळगाव शहरात झालेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा व गुणवत्ताही प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.