Salim Khatik
sakal
जळगाव: शहरातील तांबापुरा परिसरातील प्रौढाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला. घटना घडली. शहरातील बजरंग बोगद्यावरील रेल्वे रुळावर सकाळी सातला प्रवाशाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह उचलून तो जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर त्याची ओळख पटली असून, सलीम चिरागोद्दीन खाटीक (वय ४५, रा. तांबापुरा, जळगाव) असे मृत प्रौढाचे नाव आहे.