जळगाव- भररस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरणारी रिक्षा बाजूला घेण्याचे सांगितल्याने रिक्षाचालकाने विरोध करीत हुज्जत घातली. इतकेच नव्हे, तर त्याच्या साथिदारांनी साखळदंड घेऊन वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून येत पाहून घेण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी (ता.२१) शहरातील बेंडाळे चौकात घडली. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पाचही संशयितांना अटक करण्यात आली आहे.