Jalgaon Accident : आनंदाचा सोहळा ठरला अखेरचा; निवृत्तीचा कार्यक्रम आटोपून परतताना काळाचा घाला

Fatal Car Accident Near Bhokani Village : जळगावजवळील भोकणी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात कारचा पूर्णपणे चुराडा झाला असून, या दुर्घटनेत नाशिकमधील एकाचा मृत्यू झाला आहे
Car Accident

Car Accident

sakal

Updated on

जळगाव: नशिराबाद येथील शिक्षक मित्राचा निवृत्ती कार्यक्रम आटोपून पहाटेच नाशिकच्या दिशेने निघालेल्या मित्रांच्या कारला बांभोरी पुलापुढील भोकणी गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील निवृत्त रेल्वे कर्मचारी दीपक श्रीपतराव सोमवंशी (वय ५८, रा. नाशिक) ठार झाले. त्यांचे मित्र दिलीप सोमवंशी, ललित वासुदेव भंगाळे आणि राजू सरदार (सर्व रा. नाशिक) गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (ता. १) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com