जळगाव: शहरालगत दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला.जळगाव-अजिंठा महामार्गावर चिंचोली (ता.जळगाव) गावाजवळ सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला बोलेरो पिकअप वाहनाने मागून धडक दिली. यात ट्रॅक्टरवर बसलेल्या कामगाराचा मृत्यू झाला. .संजय नामदेव सोनवणे (वय ४०, रा. गेंदालाल मिल, जळगाव) असे मृत कामगाराचे नाव आहे. दुसऱ्या घटनेत वृद्ध दुचाकीने जळगावकडे येत असताना नवीन वळणमार्गावर (बायपास) सुसाट वाहनाच्या धडकेत नंद साबनदास जगिया (वय ६५) यांचा जागीच मृत्यू झाला..शहरातील गेंदालाल मिल परिसरातील संजय सोनवणे हा तरुण मालधक्क्यावरून सिमेंटच्या गोण्या वाहतुकीचे काम करतो. नेहमीप्रमाणे शुक्रवारी (ता.१९) सकाळी तो इतर मजुरांसह मालधक्यावर गेला होता. तेथून सिमेंटच्या गोण्या भरून चिंचोली येथे खाली करण्यासाठी ट्रॅक्टरसोबत गेला होता. .चालक प्रवीण कोळी हा चालवत असलेल्या ट्रॅक्टरच्या (एमएच १९, बीजी ६०७८) धुडावर बसून तो संजय हा जळगावकडे परतत असताना समोरून सुसाट आलेल्या बलेरो पिकअप मालवाहू वाहनाने (एमएच १९, सीवाय ८६९१) त्यांच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या धडकेत संजय सोनवणे हा ट्रॅक्टरवरून खाली कोसळून त्याच्या डेाक्याला गंभीर दुखापत झाली. .जखमीवस्थेत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात मृताची बहिणी सविता भिकन कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बलोरो पिकअप चालक मनीष ऊर्फ खाज्या अशोक बेड (रा. शिवाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघातग्रस्त वाहने एमआयडीसी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिस नाईक गफूर तडवी तपास करीत आहेत..अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठारराष्ट्रीय महामार्गावरील पाळधी-तरसोद या नव्या महामार्गावर अपघाती मृत्यू नित्याचे झाले आहे. भुसावळ येथील रहिवासी नंद साबनदास जगिया (वय ६५) त्यांच्या दुचाकीने (एमएच १९, बीसी ९६९०) भुसावळकडून जळगावच्या दिशेने येत होते. तरसोद फाट्यावरून नव्या महामार्गाने दुचाकीवरून जात असताना सुसाट अज्ञात वाहनाने असोदा गावाजवळ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. .Indian Railway : भारतीय रेल्वेची जागतिक भरारी! मोझांबिक देशासाठी धावणार स्वदेशी बनावटीचे रेल्वे इंजिन.अपघातानंतर वाहनचालक न थांबता सुसाट पसार झाला. ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. मृताच्या खिश्यातून आधारकार्ड मिळून आल्याने त्यांची ओळख पटली. कुटुंबीयांना कळविण्यात आले. मृत नंद साबनदास जगिया यांना सहा भाऊ असून ते, स्वतः अविवाहित असल्याचे परिचितांनी माहिती देताना सांगितले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्राथमिक तपास पोलिस नाईक प्रदीप राजपूत, ज्ञानेश्वर कोळी करीत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.