काळरुपी ट्रॅक्‍टरने घेतला विद्यार्थ्याचा बळी

jalgaon student deth in tractor two wheeler
jalgaon student deth in tractor two wheeler

जळगाव, बारावीचा हिंदी विषयाचा पेपर देवून घराकडे परणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला विनानंबरच्या ट्रॅक्‍टरने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सव्वा दोन वाजेच्या सुमारास घडली. अदनान असद खान (वय 17 रा. अक्‍सानगर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून दुचाकीवर पाठीमागे बसलेला शेख मोहम्मंद शेख अब्दुल रहेमान कुरेशी (वय 17 रा. तांबापुरा) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातात ट्रॅक्‍टरच्या दोन्ही टायरमध्ये दुचाकी सापडल्याने तिचा चुराडा झाला. अपघातानंतर ट्रॅक्‍टरसह चालकास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fsakal.khandesh.5%2Fvideos%2F487901665229801%2F&show_text=0&width=560" width="560" height="308" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allowFullScreen="true"></iframe

कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावीची परिक्षा सुरू आहे. शहरातील मिल्लत ज्यूनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा स्वामी समर्थ विद्यालय कुसुंबा येथे नंबर आले आहेत. मिल्लत ज्युनियअर कॉलेजचा विद्यार्थी अदनान असद खान (वय 17, रा. अक्‍सानगर) वर्गमित्र शेख मोहंमद शेख अब्दुल रहेमान कुरेशी (वय 17, रा. तांबापुरा) असे दोघेही शनिवारी 11 ते 2 या हिंदीचा पेपर लिहून बाहरे पडले. कुसुंबा येथे परीक्षा असल्याने अदनान याने त्याच्या नातेवाइकाची दुचाकी (क्र. एमएच 19 एमव्ही 3055) मागून आणली होती. त्याच दुचाकीने तो, आणि त्याचा मित्र शेख अब्दुल कुरेशी असे दोघेही घराकडे परतत होते.दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास कुसुंबा येथील हॉटेल नीलांबरी जवळ समोरून येणाऱ्या विनानंबरच्या ट्रॅक्‍टरने दुचाकीला धडक दिली. या जोरदार अपघातात दुचाकी स्वार अदनान खान हा जागीच ठार झाला. तर शेख मोहम्मद गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळावर नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, दिनकर खैरनार, जितेंद्र राजपूत अशांनी धाव घेतली. मयत तरुणासह जखमीला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दोघा तरुणांना जिल्हा रुग्णालयात आणल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अदनान याला मयत घोषित केले, तर शेख मोहमंद याच्यावर उपचार सुरू आहे. अपघातात ट्रॅक्‍टर चालक देखील जखमी झाला असून विना नंबरच्या ट्रॅक्‍टर-ट्रॉलीसह एमआयडीसी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. 

एकुलता एक मुलाचा मृत्यू 
मयत अदनान हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील असद खान हे रिक्षा चालक आहे. ते सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी अदनानच्या नावाने अदनान फाउंडेशन स्थापन केली आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यक्रम घेत असतात. अदनानच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची मिळताच अदनान याच्या शाळेतील मित्र, शिक्षकांसह नातेवाईक आणि मित्र मंडळींची जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी जमली होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. 

24 तासात दुसरा बळी 
कंपनी कामगार अनिल पाटील यांना वाळू वाळू डंपरने खोटेनगर स्टॉपजवळ धडक दिल्याने त्यात मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी घडली होती.या घटनेला 24 तास उलटतनाही तोवर दुसऱ्या निष्पाप तरुणाचा बळी गेला. 

विनानंबर प्लेट वाहने.. 
वाळू माफियांनी गेल्या आठवड्यात पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांना आत्महत्त्येची धमकी दिल्याने, पोलिसदलाने कारवाईतून माघार घेतली आहे. तर सोयीच्या भुमिकेत असलेल्या उपप्रादेशीक परिवहन विभागही सुस्तावला आहे. शहरात मृत्युची वाहने म्हणुन ओळखले जाणारे नागरीकांचा जीव घेण्यासाठीच विनानंबर डंपर, ट्रॅक्‍टर चक्क सुसाट पळत असून यंत्रणेनेही हात वर केले आहे. 


ओव्हरटेकचा निर्णय चुकला 
समोर चालत असलेल्या मारुती कारला ओव्हरटेक करुन वळण घेणार इतक्‍यात सुसाट ट्रॅक्‍टरशी सामना होवून दुचाकीसह दोघे विद्यार्थी ट्रॅक्‍टरच्या चाकात सापडले, धडक होताच मागे बसलेला मोहम्मद शेख दहा फुट उंच हवेत चेंडू सारखा फेकला जावून महामार्गावर पडला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com