Salim Tadvi
sakal
जळगाव: कॅनमधून आणलेले डिझेल ट्रॅक्टरमध्ये टाकताना चालकास विषबाधा झाल्याची घटना घडली. नेहमीप्रमाणे कॅनमध्ये टाकलेली नळी तोंडात घेत डिझेल ओढण्याचा प्रयत्न करताना, डिझेल नाक-तोंडासह थेट पोटात गेल्याची घटना फत्तेपूर (ता. जामनेर) येथे घडली होती. पोटात डिझेल गेल्याने त्रास झाल्यानंतर चालक सलीम गुलाब तडवी (वय ३४) यास उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवस मृत्यूशी कडवी झुंझ दिल्यानंतर त्यांचा आज मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांत अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.