Tur Crop
sakal
जळगाव: शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्याने तुर पिकाची वाढ होऊन उत्पादन बऱ्यापैकी होईल, असा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. परंतु, गेल्या दोन-तीन आठवड्यात वातावरणात अतिथंड व पुन्हा तापमान वाढून कमी होत असल्याने पुन्हा गारठा सुरू झाला आहे. त्यामुळे तुरीवर अळीने आक्रमण केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. यंदा अतिवृष्टीने इतर पिकांचे नुकसान झाले आहे. आता थंड वातावरण व अळ्यांमुळे तूर पीक हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांत दिसून येत आहे.