Jalgaon News : गुलाबी थंडीची प्रतीक्षा संपणार! ७ नोव्हेंबरपासून जळगावात थंडीचा जोर वाढणार, तापमान १७ अंशांपर्यंत खाली येणार
Weather Pattern: Rain and Humidity Over Jalgaon District : जळगाव जिल्ह्यात अरबी समुद्रातील डीप डिप्रेशनमुळे ३ व ४ नोव्हेंबर रोजी ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाची शक्यता आहे. मात्र, हवामान अभ्यासकांच्या मते ५ नोव्हेंबरपासून पाऊस माघार घेईल आणि ७ नोव्हेंबरपासून थंडीचा जोर वाढेल.
जळगाव: यंदा ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी अरबी समुद्रात सध्या डीप डिप्रेशन (वायुदाब) निर्माण झाल्यामुळे ढगांचे घन संचय होत आहे. त्यामुळे पाऊस ओलाव्यासह गुजरात व महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत.