पत्नीचा कुऱ्हाडीने केला खुन अन्‌ केली आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

जळगाव ः शहरातील खेडी परिसरात पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची खळबजण घटना आज उघडकीस आली. तर खुन करून फरार झालेल्या पतीने स्वतःला आसोदा रेल्वे गेट जवळील रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या केली. 

जळगाव ः शहरातील खेडी परिसरात पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची खळबजण घटना आज उघडकीस आली. तर खुन करून फरार झालेल्या पतीने स्वतःला आसोदा रेल्वे गेट जवळील रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या केली. 

मुळ रहिवाशी धारशिरी पाळधी येथील सोनी समाधान साळवे (वय 30) हे पती समाधान साळवे (वय 35) हे खेडीतील आंबेडकर नगरात दोन मुली, एक मुलगा सोबत रहत होते. मोलमजूरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. नेहमी प्रमाणे रात्री दहाच्या सुमारास जेवण करून झोपले होते. पहाटे दोनच्या सुमारास समाधान साळवेंनी घरातील कुऱ्हाडीने पत्नी सोनीच्या गळ्यावर वार करून खून केला. खुनानानंतर समाधान हा तेथून फरार झाला होता. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांनी घनास्थळी जावून धाव घेऊन घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. त्यांतर पत्नीचा खुन केल्याबद्दल पती समाधान याच्याविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची दाखल होती. 

अन रेल्वे खाली झोकून दिले.. 
सकाळी दहा वाजता असोदा रेल्वे गेट येथे रेल्वे रुळावर दहा वाजता एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचे माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून मृताची ओळख पटवली. खेडी येथील खुन झालेल्या महिलेचाच पती असल्याचे तपासासून समोर आले. 
....... 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon Wife's ax murdered and husbund suicide