Youths
sakal
जळगाव: सध्याच्या काळात शासकीय किंवा खासगी नोकरी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा असून, सर्वत्र बेरोजगारीची ओरड होताना दिसते. मात्र, याला छेद देत जळगाव जिल्ह्यातील १ हजार ६८३ तरुणांनी चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःचे उद्योग उभे केले आहेत. विशेष म्हणजे, ''नोकरी मागणारे'' न राहता ''नोकरी देणारे'' बनलेल्या या तरुणांनी गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात ५ हजार ८३९ जणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.