SAKAL Exclusive : अन् शाळाच बोलू लागली; शिक्षक मनोज पाटील यांचे परिश्रम

SAKAL Exclusive : सवाई मुकटी (ता. शिंदखेडा) येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी केवळ पोषण आहारासाठी नव्हे तर ज्ञानार्जनासाठी येऊ लागले आहेत.
Teacher Manoj Patil painting the walls.
Teacher Manoj Patil painting the walls.esakal

SAKAL Exclusive : सवाई मुकटी (ता. शिंदखेडा) येथील जिल्हा परिषद शाळेला पूर्णतः अवकळा आलेली होती. द्विशिक्षकी शाळेत बदली करायलाही कोणी धजावत नव्हते. विद्यार्थी शाळेत पोषण आहार घेण्यासाठीच उपस्थित राहत. लेखन व वाचनापासून कोसो दूर होते. या शाळेत जूनमध्ये शिक्षक मनोज पाटील रुजू झाले अन् शाळेचे दारिद्र्यच संपले. शहरी शाळेलाही लाजवेल अशी शाळा झाली आहे. विद्यार्थी केवळ पोषण आहारासाठी नव्हे तर ज्ञानार्जनासाठी येऊ लागले आहेत. पाटील यांच्या प्रयत्नांना ग्रामस्थांनी सलाम केला आहे. (Jalgaon ZP School at Sawai Mukti Shindkheda Teacher Manoj Patil made revolution)

भिंती केल्या बोलक्या

मनोज पाटील यांनी पूर्ण शाळेला रंगरंगोटी केली आहे. अनामत रक्कम आणि लोकसहभागातून रंग उपलब्ध केले. स्वतः रंगरंगोटी केली. भिंती बोलक्या केल्या. या भिंतीवरील लेखनाचे विद्यार्थी सहज वाचन करू लागले आहेत.

सलग चोवीस रविवार शाळेत हजर

या शाळेवर बदलीने रुजू झाल्यानंतर सलग चोवीस रविवार शाळेत येत आहेत. पाटील यांनी शाळा विकासासाठी केलेले काम आणि सेवा भारत देशाच्या सैनिकांना अर्पण केली आहे.

शैक्षणिक साहित्य वितरण

गुणवत्तावाढीस चालना मिळावी म्हणून विद्यार्थ्यांना राजा कंपनीच्या पाट्या, वह्या, लेखन साहित्य, बालमित्र पुस्तक, पाणी बॉटल मोफत वाटप केले. (latest marathi news)

Teacher Manoj Patil painting the walls.
Dhule Lok Sabha Election : धुळ्यात मतदानाचा टक्कावाढीसाठी प्रयत्न

चार वर्षांपासून मीटर नव्हते...

या शाळेचे वीजमीटर वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी चार वर्षांपूर्वीच काढून नेले होते. पाटील यांनी जुलैमध्ये आठ हजार आठशे रुपये भरून वीजमीटर पूर्ववत केले. वीज सुरू झाली. पंखेही बसविले.

आई-वडिलांच्या स्मरणार्थ फोटो भेट

विद्यार्थ्यांना महापुरुषांची ओळख व्हावी म्हणून पंचवीस महापुरुषांचे फोटो लावले. वाघोदे (ता. शिंदखेडा) येथील शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष रवींद्र माळी यांनी त्यांचे वडील लोटन माळी व आई देवकाबाई माळी यांच्या स्मरणार्थ पंचवीस फोटो भेट दिले.दरम्यान, पाण्याची व्यवस्था, वृक्षारोपण, ठिबक सिंचन आदी व्यवस्था केली आहे. गुणवत्तापूरक उपक्रम राबवीत आहेत.

मान्यवरांचे दातृत्व..!

या शाळेत बदल करण्यासाठी कापडणेतील विष्णू पाटील, एस. एल. राजपूत, दीपक गिरासे, उपशिक्षक हरिश्चंद्र देसले, मोहन पाटील, गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी, डी. एस. सोनवणे, शैलजा शिंदे (देवकर), केंद्रप्रमुख संतोष चौधरी आदींचे दातृत्व महत्त्वपूर्ण आहे.

Teacher Manoj Patil painting the walls.
Dhule Loksabha Election Code of Conduct : सार्वजनिक ठिकाणी आंदोलने, उपोषण, लाउडस्पीकरला निर्बंध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com