आर. जे. पाटील : अमळनेर, ता. २३ : उन्हाळी सुटीत विद्यार्थी क्रीडांगणावर खेळाचा आनंद लुटत आहेत, तर काही विद्यार्थी सुट्यांचा आनंद घेत आहेत. मात्र, सुटी असूनही शाळेतील पटसंख्या टिकविण्यासाठी व विद्यार्थ्यांनी आपल्याच शाळेत प्रवेश घ्यावा, यासाठी शिक्षक नवीन विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देत आहेत. काही अपवाद वगळता अमळनेर तालुक्यातील बहुतांश गावांत असेच चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.