Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यात अपघातांची मालिका; एका दिवसात सात जणांचा बळी
Fatal Day in Jalgaon: Seven Killed in Road Accidents : जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी मंगळवारी झालेल्या भीषण अपघातांत सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी; अपघातस्थळी पोलिसांचा तपास सुरू
जळगाव- जिल्ह्यात मंगळवार (ता. २०) घातवार ठरला. चोपडा, अमळनेर, जामनेर, यावल तालुक्यांत झालेल्या अपघातांमध्ये सात जण ठार झाले, तर काही जण जखमी झाले. सोनगीर येथे झालेल्या तिहेरी अपघातात १३०० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या.