मेहुणबारे (ता. चाळीसगाव)- येथील पोलिस ठाण्यांतर्गत घडणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस ठाण्यातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नंतर गेल्या आठवड्यात देवळी येथे झालेल्या चोरीतील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून सव्वातीन लाख रुपयांचा सोन्याचा ऐवज जप्त करण्यात यश आले. या चोरीचा तपास लावल्याबद्दल परिसरातील ग्रामस्थांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.