Jalgaon Crime News : जळगावचा अट्टल चोरटा ताब्यात

बंद घरांवर पाळत ठेवून दिवसा घरफोडी करणाऱ्या जळगावच्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली
Crime News
Crime Newssakal
Updated on

धुळे- बंद घरांवर पाळत ठेवून दिवसा घरफोडी करणाऱ्या जळगावच्या सराईत चोरट्याला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली. त्याच्याकडून तीन लाख १८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे सोनगीर (ता. धुळे) पोलिस ठाण्यात दाखल दोन गुन्ह्यांची उकल झाली. एलसीबीने अटक केलेल्या संशयिताविरुद्ध धुळ्यासह जळगाव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत सुमारे २० ते २५ गुन्हे दाखल असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com