Smartphone Addiction
sakal
उत्तर महाराष्ट्र
Smartphone Addiction : मोबाईल जवळ, नाती दूर! महाराष्ट्रातील ८५ टक्के घरांत स्मार्टफोनचा शिरकाव; संवाद मात्र हरवला
Smartphones Become Integral to Daily Life : एकाच घरात असूनही संवाद साधण्याऐवजी मोबाईल स्क्रीनमध्ये व्यस्त असलेले कुटुंब; स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे सध्या महाराष्ट्रातील कौटुंबिक जिव्हाळा आणि प्रत्यक्ष संवाद कमी होत असल्याचे सामाजिक वास्तव समोर येत आहे.
जळगाव: एकविसाव्या युगाकडे जाताना, भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत असताना, प्रत्येकाच्या जीवनात सध्याच्या ‘स्मार्टफोन’ (मोबाईल) जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्याचा थेट परिणाम आता महाराष्ट्रातील कुटुंब संस्थेवर दिसत आहे. घरात एकत्र बसून संवाद साधण्याऐवजी प्रत्येक जण मोबाईल स्क्रीनमध्ये गुंतलेला असल्याचे चित्र राज्यभरात दिसत आहे.
